रात्री जेवणानंतर तुम्ही फळे खाताय का! फळे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. वाचा कोणत्या?

उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार घेणे ही मुख्य गोष्ट आहे. पोषक तत्वांनी युक्त फळांचे इतरही अनेक फायदे आहेत. मग, ते कधीही आणि कोणत्याही प्रमाणात खाणे योग्य आहे का? फळांचे सेवन करताना काही मूलभूत नियम पाळावे लागतात हे तुम्हाला माहीत आहे का? दिवसातून दोन फळे (चार ते पाच सर्व्हिंग) खाल्ल्याने त्वचेची चमक वाढेल आणि मधुमेह आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका कमी होण्यास मदत होईल. 

फळांची एक समस्या अशी आहे की आपण सहजपणे भरपूर खातो, म्हणजे अति जास्त खाणे होते.  त्यामुळे त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. फळांमध्ये फ्रक्टोज आढळतो, हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. त्यामुळे फळे जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. दिवसातून दोनच फळे खावीत असा सल्ला डाॅक्टरही देतात.

फळांचा रस हा तुमच्या आहारात अनेक फळांचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग आहे. पॅकबंद रसांऐवजी घरगुती फायबर युक्त रसांना प्राधान्य द्या. ज्यूस साठवू नका, लगेच बनवून प्या.
बाहेरील फळांपेक्षा हंगामी आणि स्थानिक भागात उगवलेली फळे निवडा. हंगामी फळे भरपूर पोषक आणि बजेट अनुकूल असतात. बाहेरून येणारी फळे महाग असून ती अनेक दिवस टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर केला जातो.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर दुपारच्या जेवणापर्यंत फळे खाण्याची उत्तम वेळ आहे.
तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्रीच्या जेवणात फळे खायची असतील तर एक वाटी पपई खाणे केव्हाही उत्तम.
स्मूदी खाण्याच्या या ट्रेंडमध्ये फळे आणि दूध एकत्र मिसळावे की नाही असा वाद नेहमीच होत असतो. फळे दुधासोबत घेता येतात, पण जर तुम्हाला मधुमेह, पीसीओएस किंवा इतर कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर फळे आणि दूध एकत्र खाणे टाळा.
दुग्धजन्य दुधाऐवजी, स्मूदी आणि शेक बनवण्यासाठी तुम्ही बदामाचे दूध घेतल्यास अधिक उत्तम.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)