
जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये लष्कराच्या जवानांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुंदरबनीतील एका गावात दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर दोन राऊंड फायरिंग केले. बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात कुणी जखमी झाल्याचे अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.