नारळपाणी केवळ गर्मीच्या दिवसात नाही, तर इतर दिवसांमध्येही आहे खूप फायदेशीर.. वाचा याचे फायदे

उन्हाळा आल्यावर प्रत्येकाचा ओढा हा नारळपाण्याकडे मोठ्या प्रमाणात असतो. उन्हाळ्यात नारळपाणी म्हणजे तहानेवर मस्त गारेगार उपाय. नारळपाणी हा केवळ उन्हावरचा गारेगार उतारा नाही, तर नारळपाण्याचे शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत. उन्हाळ्यात आपल्याला बाह्य शरीरासोबत, आंतरीक आरोग्याचीही काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते.

 

उन्हाळ्यात नारळपाणी पिल्यामुळे तन आणि मन दोन्हींना थंडावा मिळतो. पण हे नारळपाणी केवळ थंडावा देण्यापुरते उपयोगी नाही तर, याचे असंख्य फायदे आहेत. नारळपाणी हे आजारपणा व्यतिरिक्त इतर दिवसांमध्येही पिण्याचा डाॅक्टर सल्ला देतात. नारळपाण्यामध्ये असलेले असंख्य गुणधर्म हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात. म्हणूनच नारळपाणी हे कितीही महाग झाले तरी अनेकांच्या रोजच्या आहारात असतेच.

नारळपाण्यामुळे आपल्या शरीराला आतून थंडावा तर मिळतोच, शिवाय त्यामधुन मिळणाऱ्या पौष्टीक गुणांमुळे खूप फायदा होतो. नारळपाण्यात एनर्जी, प्रोटीन, कार्बोहाइड्रेटस्, फाइबर, आयरन, व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्व मिळतात.

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाण्यामध्ये लिपिड कमी असल्याकारणाने, कोलेस्ट्राॅल वाढण्याची भीती नसते. म्हणूनच हृद्यरोगींना डाॅक्टर नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात.

 

नारळपाण्यात पोटॅशियमच्या असलेल्या मुबलक मात्रेमुळे नारळपाणी ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी उत्तम मानले जाते.

 

फायबरची मात्रा नारळपाण्यात असल्यामुळे, पोटांच्या आजारावर नारळपाणी हे अतिशय गुणकारी मानले जाते. पोटाच्या आरोग्यासाठी म्हणूनच नारळपाणी हे सर्वोत्तम पर्याय मानले जाते.

 

नारळपाण्यात फेनोलिक असल्यामुळे, यामुळे कॅन्सर रोखण्यास खूप महत्त्वाची भुमिका नारळपाणी बजावते.

 

चेहऱ्याच्या त्वचेसाठी नारळपाणी हे खूप महत्त्वाचे मानले जाते. चेहऱ्यावर उजळपणा आणण्यासाठी नारळपाण्यासारखा दुसरा रामबाण उपाय नाही.

 

वजन कमी करण्यासाठी नारळपाण्याचा वाटा फार मोठा आहे. नारळपाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)