
सुदानमध्ये लष्करी विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याने अनेक अधिकारी आणि नागरिक ठार झाल्याचे समोर आले आहे. राजधानी खार्तूमजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. अपघातात काही जण जखमी झाले आहेत. किमान 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांनी सांगितले.
वाडी सेइदना विमानतळावरुन उड्डान घेत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे सुदानी सैन्याने माहिती दिली. यात लष्करी कर्मचारी आणि नागरिक मृत्यूमुखी पडले. मंगळवारी रात्री उशिरा निवेदन प्रसिद्ध करत सैन्याने अपघाताची माहिती दिली.
जखमींना उपचारासाठी तात्काळ ओमदुरमनमधील अल-नाओ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाने अपघातस्थळी धाव घेत विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली, असे निवेदनात नमूद केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळते.