
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढच्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये दहावीची परीक्षा दोनवेळा घेणार आहे. मंडळाने आज याबाबतच्या आराखडय़ाला मंजुरी दिली. पहिली परीक्षा 17 जानेवारी ते 6 मार्चदरम्यान होईल तर दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मेदरम्यान होणार आहे. या निर्णयाचा फायदा 26 लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे.