
मुंबई महापालिकेत ‘कार्यकारी सहाय्यक’ या संवर्गातील एक हजार 846 जागा सरळ सेवेने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. मुंबई महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना महापालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेने 2 ते 6 डिसेंबर 2024 आणि 11 आणि 12 डिसेंबर 2024 या कालावधीदरम्यान ‘कार्यकारी सहाय्यक’ या पदासाठी राज्यातील विविध जिह्यांमधील पेंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली. या एक हजार 846 पदांसाठी एकूण 1 लाख 11 हजार 637 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 91 हजार 252 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एकूण एक हजार 734 पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व 91 हजार 252 उमेदवारांचा निकाल समाविष्ट आहे.