
मंत्रालयात कडक उपाययोजना केल्यानंतरही सुरक्षा वाऱयावरच असल्याचे आज दिसून आले. महसूल विभागातील दफ्तर दिरंगाईमुळे निराश झालेल्या विजय परबती साष्टे या तरुणाने आज ‘इन्कलाब झिंदाबाद’च्या घोषणा देत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आंदोलन केले. सुरक्षा जाळीवर पडल्याने तो बचावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.