सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सात मंत्र्यांच्या ओएसडीच्या नियुक्त्या, पडताळणीनंतर मंत्र्यांना दिले पीएस

mantralay

राज्य सरकारने आज सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची समग्र शिक्षा अभियानचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सात मंत्र्यांच्या ओएसडीच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांची सारथीच्या (पुणे) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांची राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

मंत्र्यांच्या ओएसडीपीएस नियुक्त्या

मंत्र्यांच्या पीए आणि ओएसडीच्या नियुक्त्या मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावल्या आहेत. मंत्री गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, बाबासाहेब पाटील, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. फिक्सर असलेले अधिकारी मंत्रालयात नको, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.