
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात वर्षभरात घरभाड्याच्या किमतीत तब्बल 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भाडेवाढ ठरली आहे. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मुंबईत सध्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यातील बहुतांशी प्रकल्प हे पश्चिम उपनगरातील आहेत. त्यामुळे तेथील घरांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.