शेअर बाजारात पाचव्या दिवशी चढ-उतार

पाच दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार किंचित उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 147 अंकांनी वधारून 74,602 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 5.80 अंक अशी किरकोळ घसरण होऊन 22,547 अंकांवर स्थिरावला. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, झोमॅटो, शेअर्स वाढले, तर सन फार्मा, पॉवरग्रीड, टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा मोटर्सचे शेअर्स घसरले. दरम्यान, उद्या, महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार बंद राहील.