परिणिती चोप्रा दिसणार वेब सीरिजमध्ये

बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा नेटफ्लिक्सच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेब सीरिज रहस्यमय थ्रीलर असणार असून पहिल्यांदाच ती वेब सीरिजमध्ये काम करणार आहे. याआधी ती ‘चमकीला’ या सिनेमात दिसली होती. 2024 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील परिणितीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते. ‘चमकीला’ची पत्नी अमरजोच्या भूमिकेत ती दिसली होती. या सिनेमासाठी तिने वजन वाढवले होते. परिणितीने इन्स्टाग्राम पोस्टवरून याबाबतची माहिती दिली आहे.