हिंदुस्थानींची क्रेडिट कार्डवरून खरेदीला पसंती

क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार मोठय़ा प्रमाणात हिंदुस्थानी क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. जानेवारी 2025 मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून झालेल्या खर्चामध्ये वार्षिक आधारावर 10.8 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 1.84 ट्रिलियन रुपये झाला आहे. एचडीएफसी बँकेचा क्रेडिट कार्ड खर्च गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत 15.91 टक्क्यांनी वाढून 50,664 कोटी रुपये झाला आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डच्या वापरात मात्र जानेवारी 2024 च्या तुलनेत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डचा खर्च 6 टक्क्यांनी कमी होऊन 28,976 कोटी रुपये झाला. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी यंदाही क्रेडिट कार्डचा भरपूर वापर केला. जानेवारी 2024 च्या तुलनेत आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डचा खर्च 20.25 टक्क्यांनी वाढून तो 35,682 कोटी रुपये झाला आहे. दुसरीकडे, ऑक्सिस बँकेचा खर्च 0.45 टक्क्यांनी कमी होऊन 20,212 कोटी रुपये झाला आहे.