
अॅपलने नुकतेच आयफोन 16 ई या नव्या फोनला लाँच केले आहे. हिंदुस्थानात 128 जीबी या फोनची किंमत 59,900 रुपये आहे. तर 512 जीबी मॉडलची किंमत 89,900 रुपये आहे. परंतु, पाकिस्तानात या फोनची किंमत हिंदुस्थानच्या तुलनेत दुप्पट तिप्पट आहे. पाकिस्तानात 128 जीबी मॉडेलची किंमत 1 लाख 67 हजार रुपये, 256 जीबी मॉडेलची किंमत 1 लाख 95 हजार आणि 512 जीबी मॉडेलची किंमत तब्बल दोन लाख 51 हजार रुपये इतकी आहे.