अर्थ खात्याकडून निधी मंजूर, तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसे नाही!

फेब्रुवारी संपत आला तरी अद्याप लाडक्या बहीणींच्या खात्यात या महिन्याचे पैसे आलेले नाहीयेत. धक्कादायक म्हणजे वित्त विभागाने महिला व बालकल्याण विभागाकडे हे पैसे पाठवले आहेत. तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेल नाहियेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेनुसार गरीब व गरजू महिलांना सरकारकडून महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. फेब्रुवारी महिना संपायला अवघे तीन दिवस बाकी आहे. तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीयेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अर्थ विभागाने यासाठीचा तीन हजार कोटी रुपयांचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित केला आहे. एकीकडे फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले नसताना सरकार मार्च महिन्यातील पैसे महिला दिनीच देण्याचे नियोजन करत आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.