
मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकांसह राज्यातील इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता लांबणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत पालिकांतील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर राज्य सरकार भूमिका मांडणार होतं. त्यावर प्रलंबित निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र आता याप्रकरणी 4 मार्चला सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबई-ठाणेसह राज्यातील प्रमुख पालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या निवडणुका वेळीच घेण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. त्या याचिकांवर मंगळवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती. जी आता लांबणीवर गेली आहे.