Sajjan Kumar : दिल्लीतील शीख दंगलीप्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

दिल्लीतील 1984 च्या शीख दंगलप्रकरणी दोन शीखांच्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे.


1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार येथे जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्येशी संबंधित खटल्यात सज्जन कुमार आरोपी होते. या प्रकरणी ते 2018 पासून तुरुंगात कैद आहेत. 12 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला व सज्जन कुमार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार आरोप निश्चित केले होते.