
आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर चहा किंवा काॅफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय सर्वात घातक असून, यामुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकतो. जेवणानंतर शक्यतो काही न खाण्याकडे किंवा पिण्याकडे कल असायला हवा. यामुळे पचनक्रियेत बिघाड निर्माण होतो. म्हणूनच जेवणानंतर फळांसोबत थंड पाणीही न पिण्याचा सल्ला डाॅक्टर देतात.
जेवणानंतर चहा/कॉफी का पिऊ नये?
जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक आहे. कारण यामुळे तुमच्या पचनक्रियेत अडचणी निर्माण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणाच्या एक तासापूर्वी आणि एक तासानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. कॉफी/चहामध्ये असलेले रसायन टॅनिन आर्यनमुळे पचनप्रक्रियेत अडथळे येतात. अतिरिक्त प्रमाणात चहा/कॉफी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला अॅनिमियाचा त्रास देखील होऊ शकतो. सोबतच हात-पाय थंड पडणे, डोके दुखी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.
जेवणानंतर फळे खाणे टाळा
रिकाम्या पोटी फळांचं सेवन केल्यास शरीरास अधिक फायदेशीर ठरते. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा नाश्त्यानंतर फळांचं सेवन करणं टाळावं. जेवणानंतर तुम्ही फळं खाल्ली तर फळांचं पचन योग्य पद्धतीनं होत नाही. शिवाय शरीराला फळांमधील पोषक घटक देखील मिळत नाहीत. तुम्हाला फळांचं सेवन करायचं असल्यास जेवणानंतर काही मिनिटांचं अंतर ठेवून फळे खावीत.
थंड पाणी पिऊ नये
पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी पिणे अतिशय गरजेचं आहे. पण जेवणानंतर तातडीनं पाणी पिणं टाळा. जेवणानंतर थंड पाणी तर अजिबातच पिऊ नये. जेवणानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यानं अन्नपदार्थ एकाच ठिकाणी साचून राहतात किंवा गोठतात. यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि जेवण पचण्यास जड जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जेवणानंतर ४५ मिनिटांनंतर साधे पाणी किंवा कोमट पाणी प्यावे.
(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)