या सरकारमध्ये नैतिकता, प्रतिष्ठा, आत्मसन्मान नाही; संजय राऊत यांची टीका

माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ”या सरकारमध्ये नैतिकता, प्रतिष्ठा, आत्मसन्मान नाही; असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

”मी नेहमी सांगतो की या सरकारच्या आसपास नैतिकता फिरकत नाही. याचा अर्थ असा आहे की सरकार त्यांच्या नेतृत्वात सुरू आहे त्यात नैतिकता प्रतिष्ठा अजिबात नाही. आत्मसन्मान नाही. सरकारमध्ये जे मंत्री आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचार खुनाचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नैतिकता असण्याची शक्यताच नाही”, असे संजय राऊत म्हणाले.