सामाजिक कार्यकर्ते रमेश ठोसर यांचे निधन

कळवा येथील रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते रमेश ठोसर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. कळवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते. दैनिक ‘सामना’चे कोपरगाव तालुका प्रतिनिधी राजेंद्र सालकर यांचे ते सख्खे मेहुणे होत.