
बेताल वक्तव्य करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात ठाण्यातील शिवसेनेच्या रणरागिणींनी संतप्त निदर्शने केली. एवढेच नव्हे तर हातात टायर घेऊन निषेध केला. यावेळी महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, आकांक्षा राणे, ज्योती कोळी, वैशाली शिंदे, वासंती राऊत, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, विद्या कदम, अनिता प्रभू, नीलिमा शिंदे, राजेश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, वनिता कोळी, पुष्पलता भानुशाली, अनुया पांजरी, रेखा पाटील, आरती मोरे, पौर्णिमा लाड, अपर्णा भोईर, वैशाली मोरे, शीला पाटील, सुरेखा खानेकर, रक्षिता सुभेदार, कविता धुमाळ, अमृता पवार, नैना सुर्वे, कांता पाटील, छाया आराममृगम, कविता सिनलकर, माहिमकर आदी उपस्थित होत्या.
डोंबिवलीत नीलम गोऱ्हे हाय हाय, टायरवाल्या कापूचा निषेध असो अशा गगनभेदी घोषणा देत शिवसैनिकांनी जिल्हा संघटक तात्या माने व महिला आघाडी संघटक वैशाली दरेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजीत सावंत, संजय पाटील, श्याम चौगुले, नितीन पवार, सुप्रिया चव्हाण, सुरेखा सावंत, सुनील सुर्वे, रिचा कामटेकर, प्रियंका विचारे, सुनील पवार आदी सहभागी झाले होते.