
न्यू इंडिया सहकारी बँक 122 कोटी अपहार प्रकरणातील फरार आरोपी अरुणभाई याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अरुण पकडला गेल्यानंतर या प्रकरणात काहीशी स्पष्टता येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येते. अरुणला दिलेले कोटय़वधी रुपये त्याने दोन ट्रस्टना दिल्याचे मेहताचे म्हणणे आहे. त्यामुळे अरुण हाती आल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल असेही सांगण्यात येते.
12 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या पथकाने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव येथील तिजोऱ्यांची तपासणी केली तेव्हा बँकेतील 122 कोटींचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपींची लाय डिटेक्टर चाचणी या आठवडय़ात करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.