तिकीट महागल्याने रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ

रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक जनता थर्ड एसी कोचमधून प्रवास करणे पसंत करते. महागडय़ा तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंोड एसीला बहुतेक लोकांची प्राथमिकता नसल्याचे दिसते. रेल्वेने गेल्या पाच वर्षांतील आकडे जाहीर केले आहेत. कोरोनानंतर थर्ड एसीमधून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी केवळ 11 कोटी लोक थर्ड एसीमधून प्रवास करायचे. मात्र पाच वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या 2.5 पटीने वाढली आहे. कोरोनापूर्वी 11 कोटी लोक थर्ड एसीमध्ये प्रवास करत होते तर 5 वर्षांत ही संख्या 26 कोटींवर पोहोचली आहे. थर्ड एसी कोचच्या तिकिटांची किंमत कमी असल्याने थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.