
देशात महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पदवी मिळवल्यानंतरही तरुणांना नोकरी मिळत नाही. मोठ मोठ्या कंपन्या बंद पडत आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. अनमॅन्ड डायनामिक्स कंपनीने 2 इंटर्नशीप पदांची भरती काढल्यानंतर 1200 जणांनी अर्ज केल्याची माहिती कंपनीचे सीईओ आणि चीफ साइस्टिंट श्रीनाथ मल्लिकार्जून यांनी दिली आहे. 1200 पैकी केवळ 20 अर्ज पुढे पाढवले असून त्यापैकी दोन जणांची निवड केली जाणार आहे. यामध्ये एक उमेदवार हा पीएचडी पूर्ण केलेला आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात रोजगारांच्या संधी वाढत नाही, याबद्दल मल्लिकार्जून यांनी चिंता व्यक्त केलीय. ते म्हणाले की, अनेक आयआयटीतील विद्यार्थी जीईई उतीर्ण केल्यानंतर शिक्षण सोडून देतात. त्यामुळे ते व्यावहारिक नोकरीसाठी तयार नसतात. खासगी कॉलेज आणि विद्यापीठात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. काही विद्यार्थी केवळ पदवी मिळण्याकडे लक्ष देतात. जुना अभ्यासक्रम, खराब शिक्षण व्यवस्था हेही विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याला जबाबदार आहे.