
साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाच्या आमदार आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे कान टोचले आहेत. दिल्लीतील साहित्य संमेलनाचे नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाबद्दल आक्षेपार्ह वक्त्यव्य केले होते. यावरच आपली प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”साहित्य संमेलनात बोलताना त्याठिकाणी काही मर्यादा ठेवल्या पाहिजे. विशेषतः जे साहित्यिक आहे, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की, राजकारणी आमच्या मंचावर येऊ नये, असं नेहमी त्यांचं वक्तव्य असतं. त्यांनीही पार्टी लाईनवरील भाष्य करू नये. त्यांनीही मर्यादा पाळाव्यात.”