दारुड्या नवऱ्याचा राग मुलांवर काढला, आईने पोटच्या तीन बाळांना विहिरीत ढकलले

बिहारमधील समस्तीपूर येथे एका महिलेने नवऱ्यासोबत भांडण झाल्याच्या रागात आपल्या तीन मुलांना विहिरीत फेकले. यात तिनही मुलांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिलेला व तिच्या पतीला अटक केली आहे.

सीमा चंदन महत्ता ही तिचा पती चंदनसोबत समस्तीपूरामधील थाहरा गावात राहायची. चंदनला दारूचे व्यसन असल्याने त्यांचे त्यावरून नेहमी वाद व्हायचे. रविवारी देखील चंदन दारू पिऊन आल्याने सीमा व त्याच्यात वाद झाला. त्यानंतर चंदन तिथून निघून गेला, मात्र रागाने धुमसत असलेल्या सीमाने झोपलेल्या तिच्या तिनही मुलांना उचलले व घराजवळील विहिरीत फेकून दिले. यात त्या बाळांचा मृत्यू झाला. या तिनही बाळांची वयं ही 2, 4 आणि 6 अशी होती. सदर महिलेने अद्याप तिचा गुन्हा मान्य केलेला नाही.