
सेल्फी काढण्याच्या बहाण्याने एका विकृताने तीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहात उभ्या असताना हा प्रकार घडला. या विकृतीला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तीनही विद्यार्थिनी आठ ते दहा वयोगटातील असून त्या शुक्रवारी शाळेत जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असताना विकृत त्या ठिकाणी आला. त्याने मुलींसोबत सेल्फी घेण्याचा बहाणा केला. दरम्यान तो जबरदस्ती करत असल्याने वावरल्या पीडित मुलीनी शेजारी असलेल्या घरात धाव घेतली. मात्र विकृतही पाठलाग करत घरात घुसला आणि त्याने मुलींसोबत अश्लील चाळे केले. यावेळी पीडितांनी मदतीसाठी टाहो फोडत आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी या विकृतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोक्सोचा गुन्हा
विठ्ठलवाडी पोलिसांनी पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीनुसार विकृताविरोधात पोस्कोसह विनयभंग केल्याचा गुन्हा विद्यार्थिनींच्या दाखल करीत अटक केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. न्यायालयाने या विकृताला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांनी दिली,