
भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ हे काहीना काही निमित्ताने किंवा दिवसाच्या महत्त्वाने आपल्या आहारात असतात. साबुदाणा हा पदार्थ त्यापैकी एक. उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे खूप सारे साबुदाण्याचे पदार्थ आपण खातो. खासकरुन उपवासाला खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा सर्वात जास्त वापरला जातो? हा असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. उपवासामध्ये पोट भरण्याशिवाय साबुदाण्याचे खूप महत्त्वाचे उपयोग आहेत.

साबुदाण्याचे आहारातील महत्त्व
साबुदाणा आरोग्यापासून ते विविध हार्मोन्सपर्यंत अनेक गोष्टींमध्ये उपयुक्त ठरू शकते. त्यामुळेच हे महिलांसाठी एक सुपर फूड मानले जाते.
साबुदाणा खिचडी जागतिक स्तरावर खूप पसंत केली जात आहे आणि दुग्धविरहित, ग्लूटेन मुक्त पौष्टिक खाणे म्हणून गणली जात आहे.

तुम्हाला फ्लू किंवा कोणत्याही प्रकारचा ताप असेल तर तुमची भूक नक्कीच कमी झाली असेल, अशा परिस्थितीत तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊन टेस्ट सुधारू शकता.
रजोनिवृत्तीच्या काळात अनेक स्त्रियांना एंडोमेट्रिओसिस आणि अतिरिक्त रक्तस्त्राव यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीतही साबुदाण्याची खिचडी खूप उपयुक्त ठरू शकते.
मासिक पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी रक्तस्त्राव जास्त होत असल्यास, एक वाटी खिचडी खाऊ शकता. यासोबतच आठवड्यातून एकदा साबुदाण्याची खिचडी जरूर खावी.
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही साबुदाण्याचे सेवन करू शकता. प्री-मेनोपॉज अवस्थेतही साबुदाणा खिचडी खाऊ शकता.
ओव्हुलेशन दरम्यान स्पॉटिंग दिसल्यास काय खावे हा प्रश्न अनेक महिलांना पडतो. या काळात अनेक महिलांना स्पॉटिंगची समस्या दिसून येते. तुमच्याही बाबतीत असे असेल तर तुम्ही साबुदाण्याचा आहारात समावेश करु शकता.पीरियड्समध्ये भूक लागत नसेल तर, साबुदाणा खिचडी खाऊ शकता. दुपारच्या जेवणात 1 वाटी खिचडी दह्यासोबत खाल्ल्यास पचनासाठी खूप फायदा होतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. )