
एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळसााहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय रांनी त्यांना जोरदार फटकारले. तसेच सकाळी चार वाजता शहांच्या दारात उभे राहता, काही स्वाभिमान आहे की नाही, असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.
”येडा माणूस आहेत. सकाळी चार वाजता जाऊन बॉसच्या दारात उभा राहतो., काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही, पैसा द्या आणि मानसन्मान मिळवा. समृद्धी महामार्गातला पैसा, बिल्डरांचा पैसा, एसआरएचा पैसा, नगरविकासमधला पैसा असा अमाप पैसा त्यांनी कमावलेयत, असे संजय राऊत म्हणाले.