
पाणी हे आपले जीवन आहे. आपल्या शरीरातील एकूण वजनाच्या साठ टक्के पाणी आपल्या शरीरामध्ये असते. खासकरून उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी बाहेर पडत असल्यामुळे, योग्य प्रमाणात पाणी पिणे हे खूपच गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, ज्यामध्ये फेस मास्क आणि महागड्या उत्पादनांचा समावेश असतो, परंतु शरीराला हायड्रेट ठेवल्याशिवाय, चेहऱ्यावर अपेक्षित चमक मिळवता येत नाही याकडे आपण दुर्लक्ष करतो.

त्वचेची योग्य पीएच पातळी असणे खूप महत्वाचे आहे. जास्त पीएचमुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेचा पीएच राखण्यासाठीही पाणी पिणे फायदेशीर ठरते.
शरीरात विषारी पदार्थांच्या उपस्थितीमुळे मुरुम, ऍलर्जी, तेलकट त्वचा होऊ शकते. हे विष बाहेर टाकण्यासाठी पाणी प्यावे.
पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाहीत आणि त्वचेचा ताणही राहतो.
वयोमानानुसार त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. परंतु पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो.
दिवसातून किती ग्लास पाणी प्यावे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय, वजन, उंची आणि त्वचेसाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा, चमक आणि आरोग्य टिकून राहते. परंतु महिलांपेक्षा पुरुषांनी अधिक पाणी पिणे हे गरजेचे आहे. महिलांना दोन ते अडीच लिटर पाणी आवश्यक असते. तर पुरुषांना किमान चार लिटर पाणी पिणे हे गरजेचे आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)