
उन्हाळ्यात आपल्याला भूक न लागण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. अशावेळी आपल्या घरातील खजूर हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. खजूर म्हणजे उत्तम उर्जेचा स्त्रोत. यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर खजूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर किंवा खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. खजूर किंवा खारीक खाल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत.
चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ शरीरयष्टीसाठी खारीक अत्यंत उपयुक्त आहे. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते.
खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.
खारकेचे सेवन करणे हे खूपच पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत खजूरामध्ये असल्यामुळे, खजूर खाल्ल्यावर उर्जावान वाटते. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते.
खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते.
खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.
आहारात खारकांचा समावेश असेल तर, त्वचेची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.
खजूर किंवा खारीक खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खावी म्हणजे ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम.
भूक वाढवण्यासाठी खारीक पावडर उकळलेल्या दुधामध्ये टाकून गार करून दूध प्यावे. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.
(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)