अतिशी विरोधी पक्षनेत्या

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड झाल्यानंतर आता ‘आप’ने विरोधी पक्षनेताही जाहीर केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी आता दिल्लीच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असणार आहेत. आज दुपारी 1 वाजता आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या भूमिकांचे मूल्यांकन करण्यासाठी लोकसभा, जिल्हा, विधानसभा आणि वॉर्ड पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांचे ऑडिट जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले.