ओवी, जान्हवी, लक्ष्य, स्मित मुख्य फेरीत

ओवी मारणे, जान्हवी सावंत, लक्ष्य त्रिपाठी, स्मित उंद्रे यांनी पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सीरिज 16 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमीत येथे ही स्पर्धा सुरू आहे. अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात लक्ष्य त्रिपाठीने तिसऱ्या मानांकित आर्य पाटकरवर 6-4, 6-3 असा विजय मिळवला. स्मित उंद्रेने अकराव्या मानांकित आश्रित मज्जीचे आव्हान 6-1, 7-6(3) असे मोडीत काढले. सहाव्या मानांकित अभिनव महामुनीने कियान पौवाला 6-3, 7-6(2) असे पराभूत केले. तनिश पाटीलने सुजय देशमुखचा 6-1, 6-3 असा पराभव केला.

मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत बिगर मानांकित ओवी मारणे हिने अव्वल मानांकित अनुष्का महामुनीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चुरशीच्या लढतीत जान्हवी सावंत हिने दुसऱ्या मानांकित प्रिशा पाटीलचा 6-3, 2-6, 10-6 असा संघर्षपूर्ण पराभव केला. रित्सा कोंडकरने रिशिता यादवचा 6-3, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. पाचव्या मानांकित अनिका नायर हिने शरण्या सावंतवर 6-2, 3-6, 10-6 असा विजय मिळवला. अनुष्का जोगळेकरने श्रेया रांजलकरचा 6-4, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.