
कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण झाल्याची चंदनवाडी परिसरात घटना घडली. मारहाणीत पोलिसाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी तिघांना एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना मारहाणीच्या घटनांचा आलेख वाढत चालला आहे. अशीच एक घटना शनिवारी दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी परिसरात घडली. तक्रारदार विजय भिंगारदिवे हे एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. फुटपाथवर बेकायदेशीर राहणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. एल. टी. मार्ग पोलिसांचे पथक शनिवारी कारवाईसाठी चंदनवाडी परिसरात गेले. तेथे कारवाई करत असताना एका महिलेसह दोघांनी भिंगारदिवे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
भिंगारदिवे याच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवल्याने त्या तिघांनी भिंगारदिवे यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली.