प्रयागराजमध्ये 25 किलोमीटरपर्यंत जाम

येत्या 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे स्नान असणार आहे. त्यामुळे प्रयागराजमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. प्रयागराजमध्ये वाहनांच्या तब्बल 25 किलोमीटरच्या रांगा लागल्यामुळे प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. यात लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे अन्नपाण्यावाचून हाल होत असल्याचे चित्र आहे. आज रविवार असल्याने भाविकांचे जथेच्या जथे प्रयागराजमध्ये दाखल झाले.  पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून सतर्क आहे. महामार्गावर मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले असून वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी पोलिसांकडून महामार्गावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बृजेश पुमार श्रीवास्तव यांनी दिली.