‘ती’ स्वेच्छेने आरोपीसोबत चार दिवस राहिली होती, बलात्कार प्रकरणी हायकोर्टाकडून जामीन

14 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली. पीडिता स्वेच्छेने आरोपीसोबत चार दिवस राहिली होती तसेच तिला कृत्यांची पूर्ण जाणीव होती असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

प्रेमसंबंधातून आरोपीने 14 वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडितेने पोक्सो कायद्याच्या अंतर्गत तक्रार दाखल करताच 2019 साली 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचे सध्या वय 24 असून त्याने 5 वर्षे, 2 महिने आणि 23 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. जामीन मिळावा यासाठी हायकोर्टात त्याने अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर करताना नमूद केले की, पीडितेविरुद्ध केलेले पृत्य हिंसक नव्हते आणि अर्जदाराचा कोणताही पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नाही. याशिवाय पीडित मुलगी आरोपीसोबत स्वेच्छेने चार दिवस राहिली असून तिला तिच्या पृत्याची पूर्ण माहिती होती.