पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आल्याने बेरोजगारी कमी होणार आहे का? तेजस्वी यादव यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारला भेट देणार आहेत. त्यामुळे राज्यातली बेरोजगारी कमी होणार आहे का असा सवाल राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. तसेच निवडणुका असल्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते येत असतात असेही यादव म्हणाले.

माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले की, जेव्हा निवडणूक येते तेव्हा पंतप्रधान मोदी राज्यात येदात. त्यांच्या येण्याने राज्याची गरीबी दूर होणार आहे की बेरोजगारी कमी होणार आहे? गेल्या 11 वर्षात पाटणा विद्यापीठाला यांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देता आला नाही. यावर काय बोलणार असेही यादव म्हणाले.