IND Vs PAK – टीम इंडियाचा अचूक मारा, पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत; टीम इंडियाला जिंकण्यासाठी 242 धावांची गरज

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना दुबईमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 241 धावांमध्ये बाद झाला आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 242 धावांची गरज आहे.

नाणेफेक जिंकून पाकिस्ताना कर्णधार मोहम्मद रिझवानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खोडून काढला. अचूक आणि भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली. मधल्या फळीत कर्णधार रिझवान (46 धावा) आणि सौद शखील (62 धावा) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना फार काळ गोलंदाजांनी मैदानावर टिकू दिले नाही. त्यानंतर खुशदिल शाह (38 धावा) याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानला सर्वगडी बाद 241 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. त्यानंतर हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.