
Champions Trophy 2025 मध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये सामना सुरू आहे. पाकिस्तानचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरला आहे. परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या अचुक माऱ्यामुळे पाकिस्तानाच अर्धा संघ 183 या धावसंख्येवर तंबुत परतला आहे. याच दरम्यान 21 व्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि हर्षित राणा एकमेकांना भीडले.
Harshit rana and Mohammad Rizwan shoulder to shoulder…. its heating in dubai🥵🥵#INDvsPAK #ChampionsTrophy pic.twitter.com/N9kucdOJwF
— Rahul Karki (@Rahulkarki417) February 23, 2025
सलामीला आलेले बाबर आझम (23 धावा) आणि इमामन उल हक (10 धावा) हे झटपट बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था 47 वर दोन अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवान (46 धावा) आणि सौद शखील (62 धावा) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान 21 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि मोहम्मद रिझवान एकमेकांना भिडले. राणाने टाकलेला चेंडूवर धाव घेत असताना रिझवानने राणाला जोरदार धक्का मारला. यावेळी राणा चांगलाच भडकलेला पहायला मिळाला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.