भिवंडीत तरुणीवर सहा नराधमांचा अत्याचार

एका 22 वर्षीय तरुणीवर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना शहरातील फातमानगर भागात घडली. नराधमांनी या तरुणीच्या भावाला मारहाण केली आणि तिला मध्यरात्री घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. नराधमांनी तिच्या भावाला बेदम मारहाण केली आणि आपल्या बहिणीला फोन करण्यास सांगितले. भाऊ अडचणीत आहे असे समजल्यावर ही तरुणी रिक्षातून बागे फिरदोस येथे आली. त्यावेळी नराधमांनी या तरुणीचा भाऊ आणि रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून तिघांना नागाव येथे नेले. तिथे या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.