
न्यायप्रविष्ट गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांना महाराष्ट्रात सामील करून घ्यावे, असे साकडे सरकारला घालण्यात येणार आहे. यासंदर्भातील ठराव रविवारी साहित्य महामंडळातर्फे मांडण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये सीमावासीयांच्या न्याय्य हक्काचाही ठराव होता.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे केवळ सोपस्कार नकोत, तर या विद्यापीठाला पुरेसा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणारा ठराव रविवारी होणाऱ्या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात येणार आहे. याशिवाय ग्रंथालयांना अल्प अनुदान आणि ग्रंथपालांना तुटपुंजे वेतन यामुळे झालेल्या ग्रंथालयांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारा ठराव मांडण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पुसुमाग्रज यांच्या नावाने सुरू होत असलेल्या मराठी अध्यासनाला पेंद्र सरकारने पुरेसा निधी द्यावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
संकल्पना, कौशल्यातून मराठी पाऊल पुढे पडेल; परिसंवादात तज्ञांनी व्यक्त केला विश्वास
संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, झोपून देऊन काम करण्याची वृत्ती, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची निती, योग्य शिक्षण या सगळय़ांची योग्य मोट बांधली तर राज्याची नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन इकॉनॉमीपर्यंत नक्की पोहोचेल, असा विश्वास ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात तज्ञांनी व्यक्त केला.
साहित्य संमेलनात आज ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा परिसंवाद झाला. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, ‘केपीआयटी’चे प्रमुख रवी पंडित, ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड सहभागी झाले. त्यांच्याशी प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला. ‘लक्ष्मीला प्रसन्न करता येते हे गेल्या 50 वर्षांत मराठी माणसाला उमगले आहे. आता मराठी माणसाला व्यवसाय करणे गैर वाटत नाही. व्यवसायात असलेली ‘रिस्क’ घेण्यासाठी आपली मानसिकता तयार झालेली आहे, असे पराग करंदीकर म्हणाले.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, उद्योग क्षेत्रात भरारी घेताना आपल्या कामात गुणवत्ता राखली पाहिजे. त्यात सर्वोत्पृष्टपणा आणला पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते काम सर्वोत्पृष्ट पद्धतीने केले पाहिजे. जगात संधी आहेत; संधींचा शोध घेतला पाहिजे. मराठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
‘स्टार्टअप इकोसिस्टम’, ‘स्टार्ट अप नेशन’ या संकल्पनांबाबत माहिती देताना रवी पंडित म्हणाले, कोणतेही काम करताना भावना, महत्त्वाकांक्षा, जिद्द महत्त्वाची ठरते. आपले व्यक्तिमत्त्व हे आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलते. जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. आराम हराम आहे, कष्टाच्या मागे धावले पाहिजे म्हणजे यश मिळतेच, असा संदेशही त्यांनी दिला.
मस्साजोग येथील घटनेचे महामंडळाच्या बैठकीत पडसाद
बीडच्या मस्साजोग आणि परभणीत घडलेल्या घटनांचा निषेध करून या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देऊन सामाजिक सलोखा राखवा, असा ठराव एका साहित्य संस्थेने मांडला होता. मात्र या ठरावाचा साहित्यांशी संबंध नाही असे कारण देत साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा ठराव मतदानासाठी टाकण्यात आला. तसेच या ठरावत दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली. शेवटी हा ठराव रद्द करण्यात आला. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱयांची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत साहित्य महामंडळाच्या घटक संस्था असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या संस्थांसह समाविष्ट व सलंग्न संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकार आणि सामाजिक विषयांवर ठराव आला की तो प्रत्येक वेळी नाकारला जातो. सरकारच्या दबावाखाली किती दिवस भूमिका घ्यायची नाही. साहित्य महामंडळ म्हणून आपण साहित्य क्षेत्राचे नेतृत्व करतो, त्यामुळे साहित्य महामंडळाने भूमिका घेतली पाहिजे.
– डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य, साहित्य महामंडळ.
तरी मराठीचे रोज का हो
धिंडवडे निघतात?
नाही मराठी पुठेही
नाही प्रेम नि जिव्हाळा
तरी दिल्लीच्या मांडवी
भरे दलालांचा मेळा
पुठे गेले बुद्धिवंत
पुठे गेले तर्पतीर्थ
काका गाडगीळ नाही
दुर्गा भागवतही व्यर्थ
तोंडी लावण्यापुरती
त्यांना हवी मातृभाषा
पण व्यवहारी त्यांच्या
इंग्रजीची अभिलाषा
शाळा मराठी संपल्या
नाही शिक्षक, विद्यार्थी
सीबीएसई बोर्डापुढे
संचालक धारातीर्थी
फक्त दिंडय़ा नि पताका
काय कामाच्या हो सांगा
ग्रंथदिंडीच्या रस्त्यात
उधळला कसा टांगा!
ग्रंथप्रदर्शन आता
कसे डोईजड झाले
पुठे गेले वाचणारे
सारे ऑनलाइनवाले!
दान, अनुदान आले
कोटी कोटींचे हातात
तरी मराठीचे रोज
का हो धिंडवडे निघतात?
‘नमो’ ‘नमो’ म्हणताना
कसे लेखक वाकले
सरस्वतीलाही त्यांनी
व्यासपीठी हो झाकले…!
– माधव डोळे