
काठे गल्ली येथील अनधिपृत धार्मिक स्थळाभोवतीचे बांधकाम शनिवारी महापालिकेने हटविले. दरम्यान, संपूर्ण बांधकाम तोडावे यासाठी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी काहीवेळ धरणे आंदोलन केले. पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले.
नाशिकच्या द्वारका भागातील काठे गल्ली परिसरात असलेल्या धार्मिक स्थळाभोवती अनधिपृत बांधकाम करून पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. त्याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी कडक पोलीस बंदोबस्तात हे अनधिपृत बांधकाम हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. धार्मिक स्थळाव्यतिरिक्त इतर बांधकाम हटविण्यात आले. संपूर्ण धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करीत भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या भागात धरणे धरले. पोलीस आयुक्तालयात जावून त्यांनी आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली.