आंगणेवाडीत भाविकांना शिवसेनेतर्फे पाणी वाटप

आंगणेवाडीत येणाऱ्या भाविकांसाठी शिवसेनेतर्फे भाविक सहाय्यता केंद्र उभारण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी मोफत बिस्लेरी पाण्याचे वाटप करण्यात आले. तब्बल 50 ते 60 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला.

आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक कोकणात येतात. या भाविकांच्या सेवेसाठी शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्यातर्फे गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई, कोल्हापूर व मालेगावच्या शेकडो शिवसैनिकांसह बिस्लेरी पाण्याचे वाटप करून भाविकांना दिलासा दिला.

तसेच भाविक सहाय्यता केंद्रामध्ये प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली. या केंद्राला शिवसेना नेते विनायक राऊत, जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक, आमदार बाळा नर, महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, सुरेश पाटील, संतोष शिंदे आदींनी सदिच्छा भेट दिली.