ऑस्ट्रेलिया–इंग्लंड सामना- लाहोरच्या मैदानात हिंदुस्थानचे राष्ट्रगीत

यजमान पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झालेल्या अव्वल आठ संघांमधील केवळ हिंदुस्थानचा तिरंगा स्टेडियमवर न लावण्याचा खोडसाळपणा केला होता. मात्र, आज नियतीने चुकीने का होईना पण लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर हिंदुस्थानच्या ‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताची धून वाजवायला भाग पाडले. दोन्ही संघांच्या राष्ट्रगीतादरम्यान हा प्रसंग पाहायला मिळाला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

झाले असे की, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील चौथा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. लढतीला सुरुवात होण्यापूर्वी प्रथेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर इंग्लंडचे राष्ट्रगीत होणार होते. मात्र, अचानक हिंदुस्थानचे राष्ट्रगीत  सुरू झाल्याने गोंधळ उडाला.