
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दास पंतप्रधानांच्या कार्यकाळात किंवा पुढील आदेश येईपर्यंत प्रधान सचिव म्हणून कार्यरत राहतील. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून डिसेंबर 2024 मध्ये शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने गेली सहा वर्षे ते आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. ते 1980 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2017 पर्यंत ते आर्थिक व्यवहार सचिव म्हणून कार्यरत होते.