
मासेमारीसाठीचा मुंबई बंदराचा परवाना अलिबाग येथे ट्रान्सफर करून देण्यासाठी परवानाधारकाकडे 15 हजार रुपयांची लाच घेताना मासेमारी व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अधिकाऱ्याला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पुलकेश कदम असे सहाय्यक आयुक्ताचे तर निरज चासकर असे सहाय्यक मत्स्य विकास अधिकाऱ्याचे नाव आहे. यांच्याबरोबर संजय कोळी या खासगी व्यक्तीवरदेखील कारवाई करण्यात आली. पंकज (नाव बदललेले) यांच्याकडे मासेमारीसाठी मुंबई बंदराचा परवाना असून तो त्यांना अलिबाग बंदरात ट्रान्सफर करायचा होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पंकज यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे सुपूर्द केले होते. या कामासाठी आरोपींनी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.