
बंदी असतानाही गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक वाडीबंदर जंक्शन येथे डोंगरी पोलिसांनी पकडला. त्या ट्रकमध्ये तब्बल 58 लाख 92 हजार रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा मिळून आला. याप्रकरणी रबीउल इस्लाम अलीहुसैन शेख (37) आणि नीरज कुमार सिंग अशा दोघांना डोंगरी पोलिसांनी अटक केली.
गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक वाडीबंदर जंक्शन येथे येणार असल्याची खबर डोंगरी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल जयेश गोळे यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून गुटखा व तंबाखूने भरलेला ट्रक तेथे येताच तो पकडला.