
तेलंगणातील नागरकुरनूल जिह्यातील एका बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने आठ कामगार अडकले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली. दुर्घटना घडली तेव्हा बोगद्यात किती कामगार होते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र किमान आठ लोक अडकले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बोगद्याचे काम सुरू असताना अचानक काही भाग कोसळला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अग्निशमन विभाग आणि हैदराबाद आपत्ती प्रतिसाद तसेच मालमत्ता संरक्षण संस्थेतील कर्मचारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.