
श्री आनंद कट्टी संगीत प्रतिष्ठानची स्मरण शास्त्रीय संगीत मैफल उद्या, रविवारी दुपारी 3 वाजता बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाच्या मिनी ऑडिटोरियममध्ये रंगणार आहे. सतारवादन सारंग वेचलेकर करणार असून त्यांना तबल्यावर सरदार हरमीत सिंग साथ देतील. तर प्रसिद्ध शास्त्रीय गायिका दिपीका भिडे-भागवत यांचाही यावेळी परफॉर्मन्स होणार असून त्यांना तबल्यावर यती भागवत आणि हार्मेनियमवर ज्ञानेश्वर सोनावणे साथसंगत करतील. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.