
हिंदुस्थान आणि जपान या दोन देशांच्या जवानांचा संयुक्त सैन्य युद्धाभ्यास 24 फेब्रुवारी ते 9 मार्च यादरम्यान होणार आहे. या युद्धाभ्यासासाठी दोन्ही देशांच्या लष्कराची एक तुकडी राजस्थानमधील धर्म गार्डियनसाठी रवाना झाली. धर्म गार्डियन सैन्य युद्धाभ्यास वार्षिक स्तरांवर दोन्ही देशांत आळीपाळीने होतो. मागील वर्षी हा युद्धाभ्यास फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये राजस्थानमध्ये करण्यात आला होता. या युद्धाभ्यासात दोन्ही देशांमधील जवानांचे कर्तृत्व पाहायला मिळणार आहे.