
लग्नात डिजेवर गाणी लावण्यावरून झालेल्या जोरदार हाणामारीत नवरीच्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे घडली. या हाणामारीत नवरीच्या एका भावाचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डिजेवर भोजपुरी गाणी वाजवण्यावरून वराकडील काही पाहुण्यांनी वधूच्या कुटुंबीयांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.